दादाभाई नवरोजी यांचे नैतिक शोषण सिद्धांत व उपायोजना

 दादाभाई नवरोजी यांचे नैतिक शोषण सिद्धांत व उपायोजना 

 ब) नैतिक शोषण:-

                        दादाभाईंनी आर्थिक शोषणाच्या सिद्धांतात ब्रिटिशांची आर्थिक नीती ही भारताची आर्थिक पिळवणूक व नागवणूक कशी करीत आहे हे सप्रमाण दाखवून दिले आर्थिक शोषणातील दादाभाईंनी भारतातील नैतिक शोषणात वरील देखील भर दिला आहे. भारताची आर्थिक लूट हा जसा गंभीर प्रश्न आहे तितकीच नैतिक लूट सुद्धा गंभीर बाब आहे भारतात सर्वच वरिष्ठ मुद्द्यांवर युरोपियन लोकांची नेमणूक होत असे या व्यक्ती प्रशासकीय सेवेतून मुक्त झाल्या की स्वदेशी निघून जात ; परंतु स्वदेशी जाताना प्रशासकीय अनुभव, कला कौशल्य व कायद्याचे ज्ञान सुद्धा त्याच बरोबर निघून जाई . त्याच्या नियुक्तीनंतर भारतात व भारतीय जनतेला उपयोग होत नसल्यामुळे पोकळी निर्माण होत होती. म्हणून दादाभाईंनी म्हटले होते की," ब्रिटिशांचे हे धोरण म्हणजे सुद्धा एक प्रकारची नैतिक लुटा हे जेव्हा एखाद्या युरोपियन व्यक्तीला नेमले जाते म्हणजे एका हिंदुस्तानी माणसाला डावलते जाते. त्याचा हक्क मारला जातो वृद्धी आणि कर्तुत्व, ज्ञान आणि चातुर्य भारतीयांजवळ नाही काय?" असा प्रश्न ते ब्रिटिशांना विचारतात ब्रिटिशांच्या अशा प्रकारच्या प्रशासकीय पद्धतीमुळे भारताचे आर्थिक, ज्ञानिक आणि प्रशासकीय स्वरूपाचे नुकसान होते भारतीय यात सुधारणा व्हावी म्हणून इंग्रजी भाषेत शिक्षण दिले व त्याचे अपेक्षित परिणामही दिसू लागले मात्र, याशिवाय शिक्षणाच्या कोणत्याही आर्थिक फायदा, प्रशासकीय फायदा भारतीयांना मिळू नये ,हे दुर्दैव आहे. सर्वोच्च व महत्वाच्या जागांपासून भारतीयांना वंचित ठेवून ब्रिटिश सरकार या देशात राज्य करू शकत नाहीत अशी त्यांची धारणा होती भारतातून संपत्ती बाहेर जाते त्याच बरोबर ज्ञान व अनुभवाच्या प्रवाह देखील बाहेर जात आहे.  

 भारतातील ब्रिटीश प्रशासकीय अधिकारी नोकरीतील मुदत संपल्यावर पैसा व आपले ज्ञान, कौशल्य बरोबर घेऊन कोणती इंग्लंड मध्ये जातात म्हणजेच भारताला आर्थिक व नैतिक दोन्ही बाबतीत गायब करून जातात त्यामुळे प्रशासनला लागणारी एक ज्ञानवंत अनुभवली पिढी भारतीयांच्या भारतात तयार होऊ शकत नाही. ब्रिटिश अधिकारी आपल्या केबिनमध्ये सुरक्षित राहतात. ते भारतीयांच्या भावना, समस्या, इच्छा-आकांक्षा व दुःख दूर करू शकत नाहीत ,उलट ब्रिटिश अधिकारी आणि जनता यांच्यात दुरावाच निर्माण होतो व तो वाढत जातो युवकांच्या आकांक्षा कोमेजल्या जातात त्यांना सामाजिक प्रशासकीय सेवेत स्थान नव्हते. त्यामुळे नैतिक लूट त्वरित थांबवावी. असे युवकांना वाटणे स्वाभाविक होते. भारतातील ब्रिटिश शासन याबाबत काही करू शकणार नाहीत असे दादाभाईंचे मत होते.


क) उपाययोजना :-

              दादाभाईंनी आर्थिक विचारातून व आर्थिक शोषणाच्या सिद्धांतातुन दारिद्र्याची कारणे, आर्थिक व नैतिक शोषणाची मीमांसा केली त्याच बरोबर त्यांनी आर्थिक परिस्थिती व प्रशासकीय परिस्थिती परिवर्तन करून दारिद्र्य कमी करता येईल. अशा उपाययोजना ब्रिटिशांना सांगितली आहे. त्यांनी प्रामुख्याने पुढील उपाय योजना सुचविले.

अ) ब्रिटिश शासनाने भारतीय सैन्यावरील खर्च कमी करावा आणि त्याच प्रमाणे राज्य कारभारावरील पैशांची होणारी वारेमाप उधळपट्टी थांबवावी वंचित मार्गानेच देशाचे कल्याण साधले जाऊ शकते व अनुचित मार्गामुळे देश विनाशाकडे जातो.

ब) भारताकडून इंग्लंड कडे अमर्यादित पैसा अव्याहतपणे जात आहे त्यामुळे भारतात दारिद्र्य हा क्षीण होत आहे. म्हणून इंग्लंडमध्ये जाणारा पैशांचा ओघ थांबविला पाहिजे. म्हणून भारतीय उद्योगधंद्यांचे नेतृत्व भारतीयांकडे देणे फार जरुरीचे आहे. त्यासाठी भारतीयांचे प्रशिक्षण केले पाहिजे. अशी सूचना त्यांनी केली होती.

क) भारत खूप मागासलेला आहे त्यामुळे इंग्लंडच्या भांडवलाची भारतात मोठ्या प्रमाणात गरज आहे परंतु त्या आवश्यकतेमधून भारतीय जनतेचे शोषण व्हायला नको, ब्रिटिशांनी भारतात भांडवल कसे निर्माण होईल, त्या त्याच्या विविध योजना आखल्या पाहिजे.


ड) भारत खूप श्रीमंत देश आहे हे भारतीयांनी गृहीत धरू नये, भारतात फार मोठ्या प्रमाणावर लोक अत्राला आहेत. म्हणून भारतीयांवर लादलेले जाचक कर ताबडतोब कमी केले पाहिजेत. सर्वसामान्य परिस्थितीत सुद्धा हे कर लोक देऊ शकत नाहीत. दुष्काळी परिस्थिती तर हे तर अधिकच जाचक स्वरूपाचे वाटतात म्हणून कराचे ओझे कमी केले पाहिजे.

इ) भारतीय प्रशासकीय सेवेचे हिंदीकरण केले पाहिजे म्हणजे नोकर भारतीत प्रशासकीय उच्चपदांवर यांनी कर्तुत्ववान भारतीय त्यांची नेमनुक केली पाहिजे. त्यामुळे आर्थिक नेतिक उत्सारणाला आळा बसेल. भारतीय नोकरांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा घेता येईल. नोकरीचे हिंदीकरण केल्यास उत्पादनाचे साधन मिळेल व दारिद्र्य कमी होऊं शकेल अशा प्रकारची उपाययोजना ब्रिटिश शासनाला त्यांनी सुचविली होती .ब्रिटिशांना इशारा दिला होता की ब्रिटिशांची राजवट राजकीय दृष्ट्या कितीही चांगली असली तरी आर्थिक दृष्ट्या ही हानीकारक आहे परकीय वृत्तीने व भावनेने राहणारी राजवड येथे कधीच चिरकाल टिकू शकत नाही.

ड) समाजवादी विषयी आस्था :-

                       दादाभाई हे दृष्टे पुरुष होते अंतरराष्ट्रीय समाजवादाच्या वाढवण्याच्या राजकीय व आर्थिक शक्तीला त्यांनी ओळखले होते म्हणून त्यांनी इंग्लंडमधील समाजवाद यांच्यासह योग मिळविण्याचा प्रयत्न केला होता.हिंडमनशी त्यांचे चांगले संबंध होते 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 1904 या कालावधीत एम्स्टरडम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी 'संमेलनात त्यांनी भाग घेतला. त्या संमेलनात त्यांनी ब्रिटिश शासनामुळे भारताचे अशा प्रकारे आर्थिक शोषण होत आहे या संबंधात माहिती दिली. तसेच जगात सर्वदूर वृद्ध वेतन देण्याची पद्धत सुरू करावी. श्रमिकांच्या अधिकाऱ्यांची जाणवू मूक व्हावी अशी मागणी त्यांनी केली होती.


कामगारांच्या श्रमाला मालमत्ता मानली पाहिजे असाही मौलिक विचारही त्यांनी मांडला होता. कामगार व श्रमिक आणि मालक यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी "Industrial commissioner ' S Courts" स्थापना करावी अशी सूचना त्यांच्या अधिवेशनात केली होती. श्रमिकांचे शोषण होऊ नये हा त्यांचा उद्देश होता त्यांनी हे विचार 'श्रमिकांचे अधिकार या ग्रंथात मांडले आहेत, दादाभाईंच्या समाजवादी दृष्टिकोनात "शोषणाला विरोध" हे सूत्र दिसते.




Comments

Popular posts from this blog

Judicial Activism (न्यायालयीन सक्रियता)

संसदेची संयुक्त बैठक  ( Joint Session of the Parliament)

नागरी सेवेचे कार्य (Functions of Civil Services)