बहुपर्यायी प्रश्न लास्की MCQ- Laski

 31. प्रा. लास्कीच्या मते, मानवी व्यक्तीमत्वाच्या विकासाला अनुकूल अशी बाह्य परिस्थिती म्हणजे.......... होय.

अ. अधिकार
ब. स्वातंत्र्य
क. समता
ड. न्याय

32. प्रा. लास्की यांनी राज्याच्या खालीलपैकी कोणत्या घटकावर परखड टिका केलेली होती ?
अ. भूप्रदेश
ब. सार्वभोमत्व
क. शासन
ड. लोकसंख्या

33. प्रा. लास्की यांनी अधिकाराच्या संरक्षणासाठी केलेल्या तरतूदी कोणत्या ?
i. सत्तेचे विकेंद्रीकरण
i. सल्लागार मंडळ
iii. राज्याचा व्यक्ती जीवनात अमर्याद हस्तक्षेप
योग्य पर्याय निवडा
अ. i, ii
ब. ii, iii,
क. i, iii
ड. वरील सर्व

34. हेरॉल्ड लास्की यांनी स्वातंत्र्याचे किती प्रकार सांगितलेले आहेत ?
अ. चार
ब. दोन
क. तीन
ड. पाच

35. प्रा. लास्की यांनी केलेल्या स्वातंत्र्याच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश होत नाही ?
अ. खाजगी स्वातंत्र्य
ब. राजकीय स्वातंत्र्य
क. आर्थिक स्वातंत्र्य
ड. शैक्षणिक स्वातंत्र्य

36. प्रा. लास्की यांनी स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी सांगितलेले उपाय कोणते ते शोधा ?
i. कोणत्याच क्षेत्रात विशेष सवलत असू नये
ii. अधिकार हे दुसऱ्यावर अवलंबून असावे
iii. राज्यकारभार हा पक्षपाती असावा
अयोग्य पर्याय निवडा
अ. i, ii
ब. ii, iii,
क. i, iii
ड. वरील सर्व

37. हेरॉल्ड लास्की यांनी खालीलपैकी कोणत्या अधिकाराला महत्वाचे स्थान दिले ?
अ. मालमतेचा अधिकार
ब. संचार स्वातंत्र्य
क. शिक्षणाचा अधिकार
ड. पिळवणूकी विरुध्दचा अधिकार

38. लास्कीच्या मते स्वातंत्र्याची उत्पत्ती........तून होते.
अ. धर्म
ब. समाज
क. राज्य
ड. हक्क

39. समानते संबंधीचे प्रा. लास्की यांचे खालील विधान वाचून योग्य पर्याय निवडा
i. समानतेशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे.
ii. स्वातंत्र्य व समता परस्पर पूरक आहेत.
iii. विकासासाठी समान संधी म्हणजे समानता होय
योग्य पर्याय निवडा
अ. i, ii
ब. ii, iii,
क. i, iii
ड. वरील सर्व

40. प्रा. लास्की यांचे खाजगी मालमत्ता विषयीचे विचार अचूक निवडा
i. सर्वांगीण विकासासाठी मालमत्ता आवश्यक आहे.
ii. मालमत्ता स्वतः कष्ट करून प्राप्त केलेली असावी असे नाही
iii. संपत्ती धारकांचे लक्ष सत्ता प्राप्ती असते
iv. संपत्तीच्या आधारावर समाजात समानता निर्माण होते.
योग्य पर्याय निवडा
अ. i, ii, ii
ब. ii, iv
क. i, iii
ड. वरील सर्व

41. प्रा. लास्की यांनी खालीलपैकी कोणत्या लोकशाही शासनप्रणालीचा स्वीकार केला ?
अ. प्रत्यक्ष लोकशाही
ब. संसदीय लोकशाही
क. अध्यक्षीय लोकशाही
ड. वरील पैकी नाही

42. खालील विधान काळजीपूर्वक वाचून अयोग्य पर्याय निवडा
अ. निरंकुश सार्वभौमत्वाची कल्पना स्वीकारणे म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याची होळी होय.
ब. प्रत्येक संस्था आपल्या कार्यक्षेत्रात सार्वभौम नसते.
क. आर्थिक लोकतंत्राशिवाय राजकीय लोक तंत्र व्यर्थ आहे
ड. विचार न करता राज्याच्या आज्ञेचे पालन करणे म्हणजे आत्मवंचना होय

43. "पाच वर्षांनी एकदा मतपेटीत मत टाकण्यात कर्तव्याची इतिश्री समजणे प्रजातंत्राच्या विरुद्ध आहे," हे विधान खालीलपैकी कोणाचे आहे ?
अ. रॉल्स
ब. लास्की
क. रुसो
ड. मार्क्स

44. प्रा. लास्की यांनी मांडलेली संकल्पना कोणती ?
अ. लोकशाही
ब. साम्यवाद
क. समाजवाद
ड. लोकशाही समाजवाद

45. प्रा. लास्कीच्या मते, "संकटग्रस्त शासक वर्ग कधीच सहजासहजी हातातील सत्ता सोडत नाही." ही गोष्ट इतिहासाचा आधार घेऊन कोणत्या ग्रंथात स्पष्ट केलेली आहे ?
अ. डेमोक्रसी इंन क्रयासेस (Democracy in Crisis)
ब. अॅन इंट्रोडक्शन ऑफ पॉलिटिक्स (An Introduction of Politics)
क. सोशलिस्म अंड फ्रीडम (Socialism & Freedom)
ड. अमेरिकन डेमोक्रसी (The American Democracy)


Comments

Popular posts from this blog

Judicial Activism (न्यायालयीन सक्रियता)

संसदेची संयुक्त बैठक  ( Joint Session of the Parliament)

नागरी सेवेचे कार्य (Functions of Civil Services)