MCQ- Management


 व्यवस्थापन


1.  आधुनिक काळातील जवळजवळ सर्वच राज्यातील राज्याचे स्वरूप खालीलपैकी कशा स्वरूपाचे असल्याचे पहावयास मिळते.

      अ. लोककल्याणकारी स्वरूपाचे

       ब. पोलिसी स्वरूपाचे

       क. वरील दोन्ही स्वरूपाचे

        ड. वरीलपैकी नाही

2. आधुनिक राज्यांची कार्यक्षेत्र व्यापक झाल्यामुळे खालीलपैकी कोणत्या गोष्टीला प्रशासनात महत्त्व प्राप्त झाले आहे.

    अ. संघटन

     ब. नियोजन

     क. व्यवस्थापन

     ड. अंदाजपत्रक

3.  प्रशासनाची कार्यक्षमता वाढवून निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रक्रिया आवश्यक व महत्वाची मानली जाते.

अ. सनदी सेवकांची भरतीची

ब. सेवकांचे प्रशिक्षणाची

क. व्यवस्थापनाची

ड. वरील सर्व

4. प्रशासकीय रचनेत व्यवस्थापनाला कशाची उपमा दिली जाते.

अ. मेंदू

ब. हृदय

क. डोळे

ड. कान

5. प्रशासनाचे यशापयश हे खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते.

अ. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता

ब. कर्मचाऱ्यांची गुणवत्ता

क. अ आणि ब दोन्ही

ड.  यापैकी नाही

6. व्यवस्थापनात खालीलपैकी कोणत्या गोष्टींना महत्त्व असते.

अ. समन्वय

ब. मार्गदर्शन

क. नियंत्रण

ड. वरील सर्व

7. व्यवस्थापनाची प्रक्रिया यशस्वीपणे व परिणामकारकपणे पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी कोणती कार्य व्यवस्थापकाला करावी लागतात.

   अ. कर्मचाऱ्यांची नेमणूक

   ब.  कर्मचाऱ्यांवर नियंत्रण

   क. कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय

   ड. वरील सर्व

8.  व्यवस्थापन ही विशिष्ट प्रकारे कार्य करणारी.....

अ. प्रक्रिया

ब.. विभाग

क. नियम

ड. यांपैकी नाही

9. व्यवस्थापन एखादी व्यक्ती किंवा व्यक्ती समूह किंवा वर्ग नसून ती एक प्रशासकीय यंत्रणेतील काय आहे ?

अ. प्रक्रिया

ब.. विभाग

क. नियम

ड. रचना

10. एखादी व्यक्ती आपल्या अनुभवजन्य ज्ञानाच्या साह्याने ज्या प्रकारे प्रशासन यशस्वीपणे हाताळण्याचे कार्यकर्ते याला काय म्हणतात ?

अ. व्यवस्थापन

ब. मार्गदर्शन

क.  नियंत्रण

ड.  नियोजन

11.  प्रशासकीय व्यवस्थापनात  खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही ?

अ. धोरण ठरविणे

ब. धोरणांची अंमलबजावणी करणे

क. मार्गदर्शन करणे

ड. समन्वय साधणे

12. "इच्छित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी औपचारिकपणे संघटित झालेल्या लोकांच्या कार्यात मदत आणि मार्गदर्शन करणारी प्रक्रिया म्हणजेच व्यवस्थापन होय", ही व्याख्या खालीलपैकी कोणाची आहे ?

अ. जाॅर्ज टेरी

ब. प्रा. जे. डी. मिलेट

क. विल्यम स्प्रिंगेल

ड. यापैकी नाही

13. खालील वाक्य क्रमाने लावून व्यवस्थापनाचा अर्थ स्पष्ट करणारे अर्थपूर्ण वाक्य बनवा.

i)  घेण्याचे शास्त्र तंत्र आणि कलेला व्यवस्थापन असे म्हणतात

ii)  किमान खर्चात जास्तीत जास्त उपयोग  करण्याकरिता धोरणांची आखणी करून

iii) त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कर्मचार्‍यांकडून काम करून

iv)  प्रशासनाच्या निर्धारित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठीउपलब्ध असणाऱ्या सर्व प्रकारच्या संसाधनाचा

   कोणता पर्याय बरोबर आहे ते ओळखा

अ. ii, iv, i, iii

ब. ii, I, iii, iv

क. iv, ii, iii, i

ड. iii, ii, i, iii

14. खालीलपैकी कोणते प्रशासकीय व्यवस्थापनाचे लक्षण नाही.

अ. उद्दिष्टांची पूर्तता

ब. संसाधनाचा पुरेपूर वापर

क. नियंत्रण

ड. निवडणुका घेणे

15. प्रशासनात काम करणाऱ्या सर्व सनदी सेवकांकडून आवश्यक ते काम करवून घेण्याची जबाबदारी कोणाची असते ?

अ. राजकीय पदाधिकारी

ब. प्रशासकीय अधिकारी

क. वरील दोन्हींची

ड. यापैकी नाही.








Comments

Popular posts from this blog

Judicial Activism (न्यायालयीन सक्रियता)

संसदेची संयुक्त बैठक  ( Joint Session of the Parliament)

नागरी सेवेचे कार्य (Functions of Civil Services)