प्रशिक्षण (Training)

 प्रशिक्षण

उच्च विद्याविभूषित आणि कुशल कर्मचाऱ्यांची नेमणूक प्रशासनात केली जाते.
शाळा व महाविद्यालयातील शिक्षण कौशल्य निर्माण करण्यासाठी व व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी आवश्यक असले तरी कर्मचाऱ्यास प्रशासकीय संघटनेचा भाग बनवण्यासाठी त्यांच्या प्रशासकीय संघटनेत समायोजन करण्यासाठी प्रशिक्षणाचे आवश्यकता असते.
बदलत्या परिस्थितीनुसार विकसित ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक
आधुनिक काळातील विज्ञान तसेच तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे प्रशासन व अन्य अधिकांश क्षेत्रात विशेष तज्ञांचे महत्त्व वाढले आहे.
शासनाचे धोरण कार्यक्रम तसेच जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कार्यरत असलेला कर्मचारीवर्ग प्रशिक्षक असणे आवश्यक आहे
प्रशिक्षित कर्मचारी हा कुशलतेने प्रशासन कार्य करू शकतो
म्हणून कर्मचारी प्रशासनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
प्रशिक्षण हा कर्मचाऱ्यांच्या भरती नंतरचे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.

प्रशिक्षणाला कर्मचाऱ्यांच्या कार्यकुशलतेची किल्ली समजली जाते.

विसाव्या शतकात तीव्रतेने परिवर्तन झाले या परिवर्तनाचा परिणाम प्रशासनावर झाला प्रशासनाचे क्षेत्र जबाबदारी वाढली

पूर्वी जगातील बहुतांश राष्ट्र पोलीस स्वरुपाची होते त्यामुळे सरकारचे कार्य मर्यादित होते
देशात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणे व देशाचे रक्षण करणे असे मर्यादित कार्य राज्याला पार पाडावी लागत.
त्यामुळे साधे, सरळ, सोपे काम त्यामुळे सरकारी नोकरांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था नव्हती.

लोक कल्याणकारी राज्यामुळे शासनाचे कार्य वाढले
कार्यातील जटिलता गुंतागुंत वाढलेली आहे
तांत्रिकता निर्माण झाली ही कार्य पार पाडण्यासाठी
कुशल व्यक्तींची आवश्यकता भासू लागली
म्हणून प्रशिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले .

प्रशिक्षणामुळे एखादे कार्य करण्याची वृत्ती निर्माण होते
ज्ञानात भर पडते
कौशल्य विकसित होतात
क्षमता वाढीस लागते

शिक्षण व प्रशिक्षण या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत.
मानवी जीवनात सतत शिकण्याची प्रक्रिया सुरू असते
आई-वडील आप्तेष्ट शेजारी समाज अनौपचारिक शिक्षण
शाळा महाविद्यालय शिक्षक यांच्याकडून औपचारिक शिक्षण
शिक्षण म्हणजे शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक स्वरूपाचे श्रेष्ठता प्राप्त करणे.

शिक्षण मनुष्याला सचेतन आणि संवेदनशील बनवितात
शिक्षण हे अनुभवातून संस्कारातून प्राप्त होते.

शिक्षण हे कायम स्वरूपाचे असून त्या व्यक्तीच्या प्रारंभापासून मिळत असते
प्रशिक्षण हे व्यावसायिक स्वरूपाचे असून ते एखाद्या विशिष्ट विषयात पुरतेच मर्यादित असतात
सेवकांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी योग्य काळी प्रशिक्षण दिले जाते.

हे प्रशिक्षण सेवेत समाविष्ट होण्यापूर्वी किंवा सेवेत असताना दिले जाते.

प्रशिक्षण हे अल्पकालीन व दीर्घकालीनही असू शकते.

कर्मचाऱ्यांकडे सोपविले विशिष्ट कार्य त्यांना व्यवस्थित पणे करता यावे याकरिता आवश्यक असलेल्या विशेष ज्ञान त्यांना देण्याच्या पद्धतीला प्रशिक्षण असे म्हणतात.
विशिष्ट कार्य करण्यासाठी कर्मचाऱ्याचे ज्ञान व कौशल्य वाढविण्यासाठी देण्यात येणाऱ्या शिक्षणाला प्रशिक्षणासाठी
प्रशिक्षण हे कर्मचारी प्रशासनातील अत्यंत महत्त्वाची आवश्‍यकता आहे.

प्रशिक्षणाची व्युत्पत्ती व विकास
प्रशिक्षणाला इंग्रजीत Training असे म्हणतात.
Training हा शब्द Train या शब्दापासून बनला आहे.
हा मुळात लॅटिन शब्द Trachinare यावर आधारित आहे याचा अर्थ ओढणे (Pull) असा आहे.
प्रशिक्षणाचे तत्वे
• त्यामुळे एखादे कार्य करण्याची स्थिती निर्माण होते
• प्रशिक्षणामुळे ज्ञान प्राप्त होते
• प्रशिक्षणाने कौशल्य विकसित होतात.
• प्रशिक्षणाने कार्यक्षमता वाढते.

प्रशिक्षणाची व्याख्या
एडमिन फ्लिपो यांच्यामते, " विशिष्ट कार्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्य वाढविण्यासाठी करण्यात येणाऱ्या कार्याला प्रशिक्षण असे म्हणतात.
फेलिकस निग्रो यांच्या मते, "प्रशिक्षणाचे कार्य केवळ कर्मचाऱ्यांचे यांत्रिक कौशल्य वाढविणे इतकेच नसून व्यापक दृष्टीने आणि व्यापक अर्थाने विकास करण्यास मदत करणे होय, जे सनदी सेवकांसाठी आवश्यक असते.
प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या मते, "मानवी कौशल्यात वाढ करण्यासाठी केलेली गुंतवणूक म्हणजे प्रशिक्षण होय."

मेंडेल यांच्या मते, "प्रशासनातील नवीन कार्यासाठी पुनरावलोकन करणे, वर्तमान करण्यासाठी ज्ञान व कौशल्यांचा विकास करणे आणि भविष्यकाळातील जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवण्यास प्रशिक्षण असे म्हणतात."

डीमाॅक आणि डिमाॅक यांच्या मते, "प्रशासनाच्या सर्व स्तरावरील कार्यासाठी, व्यक्तीत कौशल्याचे निर्मिती करण्यासाठी, त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी व अशा कौशल्याला सचेतन ठेवण्यासाठी केलेला सुसंघटित प्रयत्न म्हणजे प्रशिक्षण होय."

विल्यम जी टोरपे यांच्या मते, "सनदी सेवकांचे कौशल्य, सवयी, ज्ञान व दृष्टिकोन विकसित करण्याची प्रक्रिया म्हणजे प्रशिक्षण होय."

एफ एम माक्स यांच्या मते, " सनदी सेवकांना आपले कार्य शिकता यावे व त्यांना व्यावसायिक क्षेत्रात विकास व्हावा मार्गदर्शन व मदत करण्यासाठी राज्याच्या व्यवस्थापन विभागामार्फत जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात त्याला प्रशिक्षण असे म्हणतात."

प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये
शिक्षण आणि प्रशिक्षणात फरक आहेत शिक्षण मुख्यता ज्ञान देते तर प्रशिक्षण एका विशिष्ट प्रकारचे शिक्षण देते.
प्रशिक्षणाचे क्षेत्र मर्यादित असते तसेच विशेषीकरण त्यात असते
वैशिष्ट्ये
व्यवहारिक स्वरुप
ज्ञान व कौशल्याचा विकास
विविध घटकांचा प्रभाव
कलेचे ज्ञान
विशेषीकृत ज्ञान
प्रशिक्षीत प्रशिक्षक
विविध तंत्राचा वापर
विकासावर प्रभाव
इच्छुकांना प्रशिक्षण
अल्पकालीन प्रक्रिया
संघटित कार्य पद्धती
प्रशासकीय व व्यवस्थापकाची जबाबदारी
प्रशासन व व्यवस्थापकाला फायदा
मानवी संसाधनातील गुंतवणूक


प्रशिक्षणाचे महत्व
लोककल्याणकारी राजा मुळे मानवाच्या सर्वांगीण विकासाची सुधारित शासन आले म्हणून संपूर्ण विकास प्रशासनाच्या विविध शाखा आधारे पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे संघटनेचे कार्य कुशलता आहे त्यामध्ये कोणत्याही कार्यरत कर्मचाऱ्यांच्या क्षमतेने प्रभावित होत असते यासाठी कर्मचाऱ्यांना वेळेनुसार प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
खालील मुद्दे द्वारे प्रशिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करता येते.
सनदी सेवकांच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी
सनदी सेवकांच्या संघटन शासनाच्या धोरणाला योजना तसेच कार्यक्रमांना पूर्ण करण्यासाठी केले जाते. लोक कल्याणकारी राज्यात जनसामान्यांचे सुरक्षा विकास कल्याणाची जबाबदारी सेवकांवर आहे म्हणून आवश्यक आहे की प्रत्येक लहान-मोठ्या कर्मचाऱ्याला त्याच्या पदाच्या जबाबदारी नुसार योग्य प्रशिक्षण झाल्यावर आहे प्रशिक्षणाच्या माध्यमातून एखाद्या कार्यासाठी सामाजिक उपयुक्तता आणि शासनाच्या दृष्टिकोन कर्मचाऱ्याला समजतो त्याचबरोबर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याचा कौशल्यामुळे व अभिवृत्ती प्रशिक्षणामुळे निर्माण होते.

कार्यकुशलतेत वाढ
प्रशासनात नियुक्त कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण दिल्यास त्यांना आपल्या कामे व्यवस्थित हातात.
नवीन कर्मचाऱ्यांना अशी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.
त्याचप्रमाणे अनेक वर्षापासून कार्यरत कर्मचाऱ्यांना ही बदलत्या परिस्थितीनुसार विज्ञान आणि तंत्रज्ञानातील विकासा प्रमाणे प्रशिक्षण देण्याची गरज असते.
प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांचे ज्ञान वापरून परिस्थितीशी मेळ घालू शकतो
कारण प्रशिक्षण आणि त्यांच्यातील कुशलता व कार्यक्षमता वाढण्यासाठी मदत होते त्याचा फायदा गेले दिवस प्रशासनाचा दर्जा उंचावण्यासाठी मदत होते.

विकास कार्याला गती
आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रवेश केला आहे सामाजिक-आर्थिक विषमता तसेच मानव जातीचे कल्याण हे शासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची शक्य आहे.
बंधारे, रस्ते, इमारती, पुलांची निर्मिती, आरोग्य, शिक्षण इत्यादी सर्वच ठिकाणी उच्चतंत्र सामर्थ्य पुन्हा माणूस संशोधनाची आवश्यकता असते परंतु याहीपेक्षा महत्त्वाचे असते अर्थात मानवी संसाधने यशस्वीरित्या उपयोग करता येतो शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जनतेलाही प्रशिक्षित करणे आवश्यक आहे वाढती बेकारी तसेच अर्थव्यवस्थेचा आधार देण्यासाठी देशाच्या प्रत्येक नागरिकाला प्रशिक्षणाची आवश्यकता आहे व स्वयंरोजगाराला चालना मिळावी यासाठी असे म्हणतात कि एखाद्या व्यक्तीला दिली तर तो तिला खाऊन स्वतःचे परंतु त्याला मासे पकडण्याचे प्रशिक्षण दिले तर कुटुंबाचे पोट भरू शकेल समाजाच्या सर्व समाज विकास होण्यासाठी लोकांना सरकारची मदत प्राप्त झाली पाहिजे लोकांना व्यवसाय दिले गेले तर विकास करायला एक नवीन दिशा प्राप्त होऊ शकते.

नवीन ज्ञानाचा विस्तार
मानवी समाज व संस्कृतीचा विकास हा मुख्यतः त्यांचे बौद्धिक चातुर्य तसेच उच्चतम शारीरिक संरचनेवर अवलंबून असते ्ञानात वाढ झाल्याने मानवी जीवन यानंतर सुखी तसेच समृद्ध झाले आहे ज्ञानाच्या क्षेत्राला विस्तारित करून सर्व इच्छुक व्यक्ती पर्यंत पोहोचण्याचा कार्य महत्त्वाचे आहे तांत्रिक विकासामुळे प्रत्येक विभाग तसेच कर्मचाऱ्यांना नवीन माहिती ठेवणे आवश्‍यक झाले आहे आज विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की एक लहानशी चूक करणाऱ्या वर्षानुवर्षे मागे राहून जातो विसाव्या शतकाच्या दशकात आमुलाग्र परिवर्तन झाले ज्याचा प्रभाव प्रशासनाच्या कार्यावर प्रत्यक्षात पडतो कारण कोणत्याही संघटनेचा मूळ सिद्धांत आहे भारतात 1991च्या जागतिकीकरणाला सुरुवात झाली त्यामुळे सनदी सेवकांना अध्यापन माहिती त्वरित उपलब्ध झाली पाहिजे अशी अपेक्षा असते स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी सूचना आणि प्रसार माध्यमात ज्ञानाधारित समाज करण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे.

बदलत्या परिस्थितीशी समायोजन
ब्रिटिश काळात प्रशासनाचे मुख्य कार्य महसूल गोळा करणे तसेच शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करणे हे होते परंतु वर्तमान संदर्भात प्रशासनाचे स्वरूप पूर्णपणे विकासातून झाले आहे याचा रस्ता परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे आपल्या आसपासच्या सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक तसेच भौगोलिक पर्यावरणात बदल असतो प्रशासनावर या विविध घटकांचा प्रभाव पडतो प्रशासकीय कार्य सिद्धांत कार्यक्रम तसेच कार्यपद्धतीचा प्रभाव सर्व घटकांना पडत असतात प्रशासनाच्या पर्यावरणात्मक दृष्टिकोनाचा विचार करता भविष्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम बनवले जात आहे तसेच त्यांची अंमलबजावणीही केली जात आहे अर्थातच संपूर्ण समाजाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमाने पार पाडत आहे प्रशासनाच्या माध्यमातून विकास करणे यालाच प्रशासन शिक्षणाचा प्रसार मानवाधिकाराची मागणी वाढती लोकसंख्या समस्या तसेच प्रशासकीय अधिकारी नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत या आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रशिक्षण वर्गाची आवश्यकता निर्माण झालेली आहे.

मानव संसाधन विकास संकल्पना
आधुनिक लोक कल्याणकारी राज्यात संघटनेत कार्यरत मानव संपदा पर्यातक महत्त्व प्राप्त झाले आहे मानव संसाधन विकासाच्या नवीन संकल्पना नुसार कोणत्याही संघटनेचे कार्यकुशलता वाढविण्यासाठी त्या संघटनेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचा विकास करणे आवश्यक आहे मानव संसाधनाचा विकास आणि प्रकारच्या संघटनात्मक प्रयत्न आहे ज्यात योग्य वेतन भत्ते कार्याचे मूल्यमापन पुरस्कार अभिप्रेरणा तसेच मनोबल सकारात्मक पर्यवेक्षण आणि प्रशिक्षण हे घटक आहे मानव संसाधन यामुळे खूप सामर्थ्य आहे त्याचा वापर योग्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून तसेच कर्मचाऱ्यांना 7 समाधान प्रधान करून केले जाऊ शकते यासाठी शासकीय औद्योगिक तसेच खाजगी प्रतिष्ठान मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सेवा कालीन प्रशिक्षण दिले जात आहे.

मनोधैर्यात वाढ
कोणत्याही कार्याच्या यशस्विता त्याला महत्त्वाचा घटक आत्मविश्‍वास होय नेपोलियन बोनापार्टच्या मते, तीन चतुर्थांश लढाई ही आत्मविश्वासाने जिंकली जाते.
लढाई ही व्यूहरचना तसेच शास्त्रांत अवलंबून असते प्रशिक्षणामुळे व्यक्तींमध्ये ज्ञान, कौशल्य तसेच सकारात्मक वृत्ती विकसित होते प्रशिक्षणाने कर्मचारी आत्मविश्वास वाढतो आत्मविश्वास तसेच सातत्यपूर्ण अभ्यास आणि कर्मचार्‍यांच्या प्रशासन चालू आहे ती प्रशिक्षण तसेच आत्मविश्वासाने संपादित केली जाऊ शकते वर्तमान काळातील प्रशासकीय संस्था आणि मोठ्या स्वरूपाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांचे मनोधैर्य वाढते.


संघटनेची प्रतिमा आणि कौशल्य वाढ
कोणतीही संस्था आणि संघटनेचे प्रतिष्ठा ही त्यामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची कुशलता, कार्यशैली, व्यवहार आदी बाबीने प्रभावित होते भारतात खाजगी तसेच सरकारी संघटनेतील कर्मचाऱ्यांच्या व्यवहारांमध्ये फरक आढळतो तर खाजगी संघटना आपल्या घरात कार्याप्रती खूपच संवेदनशील असल्याने त्या आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करत असतात भारतीय लोक प्रशासनात या सनदी सेवकांना केवळ त्यांच्या कार्याशी संबंधित प्रशिक्षण दिले जाते त्यामुळे सर्वसामान्य जनतेशी कसे वागावे याचे ज्ञान सर्वांनाच असते यासाठी संवेदनशील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी भारतात टपाल कार्यालय तसेच बँकांमध्ये रुपये जमा करणे व काढण्याचे कार्य होत असतात पण त्या दोन्ही संघटनेच्या कर्मचाऱ्यांची कार्य आणि कौशल्यामध्ये अंतर असल्याने आपल्या निदर्शनास येते त्याचे कारण जाणून घेतली असता असे लक्षात येते की बँकेत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते.

चुकांचे प्रमाण कमी
प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांना कार्य करण्याचे तंत्र आणि पद्धती अवगत होतात काम करण्याची ज्ञान प्राप्त झाल्याने त्यांचे कौशल्य विकसित होते त्याचा परिणाम प्रशासनात कामात होणाऱ्या चुकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते त्यामुळे कर्मचारी आणि प्रशासन यांच्याशी निगडित कामे व्यवस्थित पद्धतीने पार पडण्यासाठी मदत होत असते.

निरीक्षणाची गरज कमी
शासकीय व प्रशासकीय धोरणे योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे किंवा नाही हे पाहणे योग्य अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून आवश्यक असते प्रशिक्षणामुळे कामगारांच्या योग्यतेमध्ये आणि कौशल्यात वाढ होत असल्याने सर्व कर्मचारी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करतात. त्यामुळे व्यवस्थापकाला अथवा वरिष्ठ अधिकाऱ्याला कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याची फारशी आवश्यकता नसते.
अशाप्रकारे सनदी सेवांसह सर्व प्रकारच्या संघटनेमध्ये वेळेनुसार प्रशिक्षणाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे मात्र टीकाकारांच्या मते प्रौढ व्यक्तींना प्रशिक्षण दिले जाऊ शकत नाही तर त्यांच्यासोबत अनुभवांची देवाणघेवाण आणि विचार विनिमय यांचे कार्य केले जाऊ शकते त्यांना शिकवण्यासाठी प्रेरित केले जाऊ शकते.



प्रशिक्षणाची उद्दिष्टे
प्रशिक्षणाची उद्दिष्टे हे निश्चित असतात त्यामुळे कोणतेही प्रशासकीय क्रिया एका विशिष्ट हेतूच्या पूर्ततेसाठी पार पाडले जाते साधारणतः खालील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नोकर वर्गाला प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली जाते
1. व्यावसायिक ज्ञान
कर्मचाऱ्यावर सोपविलेली जबाबदारी निश्चित करून त्यांना क्रिया व अवलंबिण्यात येणाऱ्या कार्यपद्धती याविषयीचे तांत्रिक ज्ञान आवश्यक असते कारण पदवी प्राप्त उमेदवाराला नोकरी प्रवेश करताना आपले कार्य पार पाडण्याची कुशलता तंत्र योग्यता याविषयीचे ज्ञान असणे असे ज्ञान प्रशिक्षण त्याला दिले जाते.
जीसीसी यांच्यामध्ये प्रशिक्षण हा असा संघटित प्रयत्न आहे की ज्यात नोकरी-व्यवसाय ज्ञान दिले जाऊन चातुर्याची लागण केली जाते . ज्या खात्यात नोकर कार्यकर्ता त्या खात्याच्या हेतु विषयी त्यांच्यात आपुलकी निर्माण केली जाते आणि खात्याचा हेतू किंवा उद्देश साध्य करण्यासाठी प्रत्येकाला आपल्या परीने भरीव योगदान करावे यासाठी व्यवस्था केली जाते.

2. कौशल्य विकास
उपक्रमातील विशिष्ट कार्य करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये विकास करून त्यांना आपली कार्य समर्थपणे करता यावेत यासाठी प्रशिक्षणाची योजना आखली जाते कारण कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण न दिल्यास ते यंत्र मानवाप्रमाणे कार्यकर्त्यांनी त्यांचे कार्यक्षेत्र ते वाक्य व त्याचे विभागाबद्दल होईल मात्र प्रशिक्षणातून कर्मचाऱ्यांना त्यांच्या विभागाच्या ज्ञानाबरोबरच त्यांच्या समाजासाठी असलेले कर्तव्य समाजासाठी असलेल्या भाकऱ्या कशा प्रकारे पार पाडता येईल याचेही ज्ञान दिले जाते.
श्री अशोक चंदा यांच्या मते प्रशिक्षणाचा हेतू मने खुली करण्याचा आहे.
प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांशी पण अनेक वास्तवात ही समस्या आणि मानवी व सामाजिक परिस्थितीशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित केला जातो असा संबंध प्रस्थापित करण्याचा उद्देश त्यांच्या जीवनातील वास्तविकता सामाजिक वास्तविकता यासंबंधीची जाणीव करून देणे आहे.
3. तांत्रिक ज्ञान
प्रत्येक कर्मचाऱ्याकडे विशिष्ट कार्याची जबाबदारी सोपवली जाते. त्या विशिष्ट कार्याचे स्वरूप त्याच्याशी संबंधित असलेल्या बाबी त्याविषयीचे तांत्रिक ज्ञान कर्मचाऱ्यांना देणे आवश्यक असते. तसेच सोपविलेल्या कार्याची अंमलबजावणी करताना त्यासंबंधीच्या कार्यपद्धतीची तांत्रिक माहिती कर्मचाऱ्याला देणे आवश्यक असते हे तांत्रिक ज्ञान देऊन कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी प्रशिक्षण देणे हा त्यामागचा हेतू आहे.

4. क्षमता विकसित करणे
कर्मचाऱ्यांना सोपवलेली जबाबदारी पार पाडता यावी समस्या सोडविता याव्या कारण सर्व भागातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, भौगोलिक परिस्थितीही सारखे नसते. तसेच व्यक्ती व्यक्तीच्या क्षमता ही भिन्न असतात. या विषयीची माहिती प्रशिक्षणाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना देऊन त्या अडचणींवर मात करण्याची क्षमता त्यांच्यात विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. तर विशिष्ट कार्यकर्त्यांना कर्मचाऱ्यांना विषयाचे ज्ञान असणे आवश्यक असते त्याशिवाय ते अचूक निर्णय घेऊ शकत नाही म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये अचूक निर्णय क्षमता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

5. जबाबदारीची जाणीव
कर्मचाऱ्यांनी निष्ठापूर्वक कार्य पार पाडावे यासाठी क्षमता व वृत्ती यांच्यामध्ये जबाबदारीची भावना वाढविणे आवश्यक असते. अन्यथा कर्मचाऱ्यांत एक दुसऱ्यावर कार्य करण्याची वृत्ती असेल तर प्रशासकीय संघटना हे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे केव्हापासून पडण्याची शक्यता असते म्हणून प्रशिक्षणाच्या साह्याने कर्मचाऱ्यास जबाबदारीची जाणीव विकसित करणे आवश्यक असते.

6. नवीन दृष्टिकोनाचा विकास
कनिष्ठ स्तरावर काम करणारा कर्मचारी हा उद्याचा वरिष्ठ अधिकारी असतो यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून आपले नियंत्रणाखालील कनिष्ठांशी दैनंदिन संपर्क साधावा. सभा, टेलिफोन वरील संभाषण, बैठकी, फाईल याद्वारे कनिष्ठांना अनुभव प्राप्त होतात. या अनुभवाचा उपयोग नवीन दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी केला पाहिजे. प्रशिक्षणाद्वारे व्यवस्थेची क्रियाशीलता, प्रभावशीलता व गतिशीलता वाढविले जाते. बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःत बदल करून घेण्याची आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यानुसार कारवाई करण्याची क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न व त्यांचा दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो स्वतःची वागणूक व व्यवहार समजून घेण्याची संधी मिळते त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सामूहिक जीवन असण्याची प्रवृत्ती विकसित होण्यास मदत होते.

7. मनोधैर्याचा विकास
कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर उपक्रमाचे यश नावलौकिक हे अवलंबून असते ज्या प्रशासकीय संघटनेत वृक्ष मनोबल असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असते तेथे असलेले उपक्रम अधिक यशस्वी होतात यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची तरतूद केली जाते प्रशिक्षणाद्वारे दृढता वसाहत पूर्वक कार्य करण्याची जिज्ञासा कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण करणे तसेच ही जिज्ञासा वाढीस लागण्यास संबंधीच्या मनोवृत्तीत बदल करणे आवश्यक असते.
प्रशिक्षणात कर्मचाऱ्यांच्या नैतिक पेपर व निपक्षपाती पण आपण जोर दिला जात असल्यामुळे तसा नैतिक विकास घडून येण्यास मदत होते परिणामी त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मदत होते.

8. स्वतंत्र निर्णय
बदलत्या परिस्थितीनुसार विशिष्ट कार्य करताना येणाऱ्या अडचणींची माहिती देऊन त्यांना देण्याची क्षमता करणाऱ्यांमध्ये निर्माण करणे हा प्रशिक्षण योजनेचा मुख्य उद्देश असतो कारण कर्मचाऱ्यांच्या स्वयम् निर्णय घेण्याच्या क्षमतेवर संपूर्ण प्रशासन व्यवस्थेचे यश अवलंबून असणे नोकरा तशी क्षमता विकसित करण्याचे महत्त्वाचे कार्य हे प्रशिक्षणाद्वारे केले जाऊन त्यांचा दृष्टिकोन हा विकसित केला जातो.

9. भविष्यकालीन उपक्रमाचे ज्ञान
प्रशिक्षणाचा उद्देश व्यापक असल्याने ते कर्मचाऱ्यांच्या वर्तमान कार्यात प्रभावीपणे व कार्यक्षमता निर्माण करणे एवढ्यापुरतेच मर्यादित राहत नाही भविष्यकालीन बरिष्ठ पदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी सक्षम करणे हा व्यापक हेतू प्रशिक्षणाचा असतो वरिष्ठ पदाची सत्ता व जबाबदारी सांभाळण्याची शकते प्रशिक्षणाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण केली जाते.
रोस्ट पोलेक यांच्या मते जर प्रशिक्षण रुपये वृक्षाची गोड फळे शाखा विषय असतील तर वेळ कौशल्य व पैसा यांची अत्यंत चातुर्याने गुंतवणूक केली पाहिजे त्यासाठी विविध उपक्रमाची माहिती कर्मचाऱ्यांना पुरविणे हे प्रशिक्षणाचा उद्देश आहे.












Comments

Popular posts from this blog

नागरी सेवेचे कार्य (Functions of Civil Services)

Judicial Activism (न्यायालयीन सक्रियता)

संसदेची संयुक्त बैठक  ( Joint Session of the Parliament)