संसदीय प्रश्नोत्तराचा तास (Questions Hour of Parliament)

संसदीय प्रश्नोत्तराचा तास (Questions Hour of Parliament) 
                
                                  प्रा. शुभांगी दिनेश राठी 
                 श्रीमती प. क. कोटेचा  महिला महाविद्यालय,
                                            भुसावळ

• संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे.
हा कायदा करत असताना संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या पटलावर विधेयक मांडले जाते.
• या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यापूर्वी त्याला विविध प्रक्रियेतून जावे लागते .
• या भागात आपण संसदीय कामकाजाचे साधने म्हणजेच प्रश्‍नोत्तराच्या तासाच्या संदर्भात विचार करणार आहोत.
प्रश्न काळ:
     प्रश्न काळ म्हणजे सभागृहाच्या प्रत्येक बैठकीचा पहिला तास जो प्रश्न विचारणे आणि उत्तर देण्यासाठी असतो तो प्रश्न काळ म्हणून ओळखला जातो.
• प्रश्न विचारण्याचा अधिकार संसदेच्या सदस्यांना असतो.
• लोकसभेचे सदस्य लोकसभेत प्रश्न विचारू शकतात तर राज्यसभेचे सदस्य हे राज्यसभेत प्रश्न विचारू शकतात
• पूर्वी 15 दिवस आधी प्रश्न विचारणे आवश्यक होते.
सध्या बदल करण्यात आला
• सध्या कमीत कमी 10 व जास्तीत जास्त 21 दिवसापर्यंत प्रश्न विचारू शकतात

• प्रश्न विचारण्यासाठी त्यांना छापील फॉर्मवर प्रश्न विचारावे लागतात
• या अर्जावर स्वतःचे नाव सर्वात वर लिहावे लागते प्रश्न कुणाला विचारलेला आहे त्या विभागाचे किंवा मंत्राचा उल्लेख करावा लागतो.
• तसेच त्या प्रपत्रकात प्रश्नाच्या उत्तराचा दिवसही नमूद करावा लागतो.
•  त्या प्रकारात सर्वात शेवटी स्वतःची सही प्रश्न विचारणार्‍या सदस्याला करणे अनिवार्य असते.
• हे प्रश्न त्यांना लेखी स्वरूपामध्ये सभागृहाच्या महासचिवांना द्यावे लागतात.
• सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी ही संबंधित विभागाच्या मंत्र्यांची असते.
• सभागृहात विचारण्यात आलेल्या प्रश्नांची विभागणी पाच गटांमध्ये केली जाते.
• त्यासाठी ए, बी, सी, डी, इ अशी विभागणी केली जाते
• या गटातील प्रश्नांना सोमवार मंगळवार बुधवार गुरूवार शुक्रवार अशा पाच दिवसांमध्ये उत्तरे दिली जातात.
प्रश्न काळातील प्रश्नांचे प्रकार :
सदस्यांना तीन प्रकारचे प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे
1. तारांकित प्रश्न  (Star Questions)
2. अतारांकित प्रश्न (Unstar Questions)
3. अल्प सूचना प्रश्न (Short Notice Questions)

तारांकित प्रश्न :
• या प्रश्नाच्या सुरुवातीला स्टार असे चिन्ह दिलेले असते.
•  प्रश्नाच्या तोंडी उत्तरासाठी या चिन्हांचा वापर केला जाातो. 
या प्रश्नातून पुरवणी प्रश्न निर्माण होतात असेच प्रश्न या तारांकित प्रश्न मध्ये विचारले जातात
आकडेवारी निवेदन या सविस्तर माहितीचा यात समावेश नसतो
सभागृहाच्या अध्यक्षाला तारांकित प्रश्‍नांना तारांकित करण्याचा अधिकार आहे
एका दिवशी किती प्रश्न सदस्यांनी विचारावे याचे बंधन नसते
• तोंडी उत्तरे देतांना प्रश्नाच्या यादीत एक सदस्य एक प्रश्न असे जास्तीत जास्त वीस प्रश्न विचारले जातात.
• जास्तीत जास्त उत्तरे मिळावी यासाठी एका प्रश्नासाठी साधारणतः आठ मिनिटांचा वेळ दिला जातो.
• या विभागाला प्रश्न विचारले असेल त्या विभागाच्या मंत्राला प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक असते.

अतारांकित प्रश्न : 
• लेखी उत्तरासाठी जे प्रश्न विचारले जातात त्यांचा समावेश होतो
• या प्रश्नात आकडेवारी दीर्घ तपशील किंवा स्थानिक मुद्द्यांचा समावेश असतो.
• याशिवाय प्रशासकीय तपशीलाचा ही समावेश असतो
• या प्रश्नाचे उत्तर लिखित स्वरूपात मंत्री प्रश्न काळाच्या शेवटी सभागृहाच्या पटलावर मांडतात.
• तारांकित प्रश्न यादीत असलेल्या एका सदस्याचे पाच प्रश्न लेखी उत्तरासाठी घेतले जातात.
• एकूण जास्तीत जास्त 230 प्रश्नांचा विचार केल्या जातो.

अल्प सूचना प्रश्न :
• तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या विषयांचा यात समावेश असतो.
• पीठासीन अधिकारी व संबंधित मंत्र्यांच्या संमतीने दहा दिवसांपेक्षा कमी कालावधीची सूचना देऊन हे प्रश्न विचारले जातात.
• प्रश्नकर्त्याला प्रश्न विचारण्यामागचे समर्थक कारण देणे अनिवार्य असते.
या प्रश्नाचे उत्तर तोंडी स्वरूपात दिले जाते

 शून्य काळ :
     शून्य काळ याचा अर्थ प्रश्न काळ संपल्यानंतर व सभागृहाचे नियमित कामकाज सुरू होण्या दरम्यानचा काळ होय.
• शून्य काळ हा प्रश्न काळ संपल्यानंतर लगेच सुरू होतो.
• तो बारा वाजता सुरू होत असल्यामुळे तो शून्य काळ म्हणून ओळखला जातो.
• याकाळात सदस्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता प्रश्न विचारता येतात
1962 पासून आपल्या भारतात ही पद्धत अस्तित्वात आहे.



Comments

Popular posts from this blog

Judicial Activism (न्यायालयीन सक्रियता)

संसदेची संयुक्त बैठक  ( Joint Session of the Parliament)

नागरी सेवेचे कार्य (Functions of Civil Services)